श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र

कुलवृत्त, जन्म व बालपण (पहिली 12 वर्षे -इ. स. 1608 ते 1620) - श्री समर्थ रामदास स्वामींचे पूर्वज कृष्णाजीपंत ठोसर हे दुष्काळ व राज्यक्रांतीमुळे बेदर प्रांत सोडून शके 884 ( इ.स. 962) साली गोदावरीतीरी हिवरे येथे येऊन राहिले. यांना पांच पुत्र होते. शेवटचा पुत्र दशरथपंत याने कसबे जांब हे गांव वसविले व स्वपराक्रमाने बाजूच्या बारा गावांचे कुलकर्णीपद मिळविले. हे रामोपासक व वैराग्यशील होते.

अधिक वाचा ...

श्री समर्थ रामदास स्वामींचे कार्य

राष्ट्रोद्धाराचे आणि धर्मोद्धाराचे ध्येय समर्थांच्या पुढे होते. ते ध्येय गाठण्यासाठी समर्थांनी आधी स्वत: 12 वर्षे तप:श्चर्या करून रामकृपा संपादन केली. शारिरीक सामर्थ्य आणि तप:सामर्थ्य मिळविल्यानंतर 12 वर्षे अखंड भारतभ्रमण करून देशस्थिती आणि धर्मस्थिती अवलोकन केली. त्यांच्या लक्षात आले की अनेक शतके पारतंत्र्यात जखडून परकीयांच्या अत्याचाराला बळी पडून भारतीय समाज अत्यंत दीन झाला आहे.

अधिक वाचा ...

श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड

स्थापनापूर्व पार्श्वभूमी - छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सदगुरूस विश्रांती मिळावी या हेतूने श्री समर्थांसाठी सज्जनगडावर मठ बांधून दिला आणि गडाची उत्तम व्यवस्था राखण्याचे आदेश दिले. इ.स. 1676 साली समर्थ कायमस्वरुपी सज्जनगडावर वास्तव्यासाठी आले. गडाच्या रक्षणासाठी समर्थांनी दक्षिणेकडे मारुतीची स्थापना केली. हा धाब्याचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.

अधिक वाचा ...

श्री समर्थ सेवा मंडळाचे विविध उपक्रम

सज्जनगड मासीक
सुंदरमठ सेवा सेवा समिती शिवथरघळ
सांस्कृतिक केंद्र-समर्थ सदन सातारा
संत सेवा पुरस्कार